VIDEO | पुणे पोटनिवडणुकीचा पत्ता नाहीच त्याच्याआधी पुन्हा एकदा राऊत-अजित पवार आमने-सामने
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यांनी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असल्याचे सांगत ही माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे म्हटलं.
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यावरून सध्या भाजप-शिंदे गट (शिवसेना), मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात चर्चा होत आहेत. तर जागावाटपावरून पेच निर्माण झाले आहेत. याचदरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यांनी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता असल्याचे सांगत ही माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे म्हटलं. तसेच ज्या मित्रपक्षापैकी ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा. त्यासाठी आमदारकीच्या निवडणूकीत कोणाला किती मतं पडली याच्या माहितीवरून ते समोर येईल. तर आमच्या मित्र पक्षांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्या मित्र पक्षाला शुभेच्छा! म्हणत राष्ट्रवादीचा दावा सांगितला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाचे नेते खासदाक संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर कोणाची कुठे जास्त ताकद आहे, हे सर्व पक्ष मिळवून ठरवतील. तिन्ही पक्षांची बैठक होईल, त्यात लोकसभेच्या जागेचा निर्णय घेण्यात येईल, असे राऊत यांनी म्हटलं आहे.