Abdul Sattar : अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार, अब्दुल सत्तार यांची माहिती

| Updated on: Jul 29, 2022 | 5:07 PM

खोतकर 31 जुलैला शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे. सत्तार म्हणाले, मी जे बोललो ते सत्य बोललो. खोतकरांना जालन्याला जाऊन तिथं घोषणा करायची आहे, असंही सत्तार म्हणाले.

नवी दिल्ली : अर्जुन खोतकर 31 जुलैला एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. अर्जून खोतकर यांनी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी सत्तारांकडून मनधरणी करण्यात आली. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करणार, असं अर्जुन खोतकर यांनी जाहीर केलंय. दिल्लीत अर्जुन सत्तार, राहुल शेवाळे आणि अब्दुल सत्तार यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खोतकर 31 जुलैला शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे. सत्तार म्हणाले, मी जे बोललो ते सत्य बोललो. खोतकरांना जालन्याला जाऊन तिथं घोषणा करायची आहे, असंही सत्तार म्हणाले. ठाकरे गटासाठी हा आणखी एक धक्का मानला जातोय.

Published on: Jul 29, 2022 05:07 PM
Navneet Rana : नवनीत राणा थांबणारी नाही, जनहितासाठी लढणारी, तरीही धमकी पत्रानंतर भीती
साखर कारखान्यांवर धडक कारवाई