Arjun khotkar: अर्जुन खोतकर यांच्या शिंदे गटात जाण्यानं फार दु:ख झालंय-चंद्रकांत खैरे
मात्र शेवटी त्यांची मर्जी अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र मी शिवसेना , मातोश्री, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काही बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद – शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun khotkar)यांच्या शिंदे गटात जाण्याने आम्हाला खूप मोठे दुःख झाल्याची भावना शिवसेनेचे (shivasena)नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अर्जुन खोतकर आणि आम्ही अनेक वर्षांपासून मित्र (friend)आहेत. आम्ही एकत्रित काम केले आहे. मात्र त्याने एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन नये असा निरोप त्यांना पाठवला. मात्र शेवटी त्यांची मर्जी अशी भावना खैरे यांनी व्यक्त केली आहे. मात्र मी शिवसेना , मातोश्री, उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत काही बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.