Video: गणेश विसर्जनाआधी विशेष लोकलची व्यवस्था करा, जयंत पाटलांची मुख्यत्र्यांकडे मागणी
विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे अनेक जण रस्त्यांऐवजी लोकलला प्राधान्य देतात. त्यामुळे विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गणेश विसर्जनाआधी विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारशी बोलून लोकलच्या फेऱ्या वाढवा असे पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. गणेश विसर्जनादरम्यान लोकलला रोजच्यापेक्षा जास्त गर्दी असते. अशावेळेस प्रवाश्यांचे हाल होतात. तसेच विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे अनेक जण रस्त्यांऐवजी लोकलला प्राधान्य देतात. त्यामुळे विशेष लोकलची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
Published on: Sep 06, 2022 11:26 AM