नितिन देसाई यांनी जीवन यात्रा संपवली; उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मनाला न पटणारं’
देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओत घळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप उघड झालेलं नाही. तर नितीन देसाई यांनी यांच्या जाण्यावरून अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई, 2 ऑगस्ट 2023 | चित्रपट क्षेत्रातील प्रख्यात कला दिग्दर्शक, निर्माता नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील स्टुडिओत घळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप उघड झालेलं नाही. तर नितीन देसाई यांनी यांच्या जाण्यावरून अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तर त्यांच्या मृत्यूने चित्रपट क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील ट्विट करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी ठाकरे यांनी, सुप्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे. अनेक मराठी-हिंदी इतिहासकालीन चित्रपट आणि मालिकांसाठी त्यांनी कलादिग्दर्शनाचं काम करुन, प्रेक्षकांचे लक्ष वेधले होतं आहे. त्यांची कामातील प्रचंड प्रतिभा अनेक नव्या प्रकल्पांना घडवत होती. त्यांचं असं जाणं मनाला न पटणारं आहे, त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली! असं म्हटलं आहे.