Special Report | मोदींविरोधात रणनिती, मातोश्रीवर हालचाली! आपचे केजरीवाल पुन्हा ठाकरे यांच्या भेटीला
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र केंद्रस्थानी असून त्यातही मातोश्रीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींना शह देण्यासाठी अनेक बडे नेते मातोश्रीवर येऊन भेट देत आहेत. आता पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र केंद्रस्थानी असून त्यातही मातोश्रीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींना शह देण्यासाठी अनेक बडे नेते मातोश्रीवर येऊन भेट देत आहेत. आता पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. केजरीवाल यांना 2024 च्या निवडणुकीआधी राज्यसभेत मोदी सरकारचा अध्यादेशावरून पराभव करायचा. यासाठी केजरीवाल यांनी विरोधकांचं समर्थन मिळवायला सुरुवात केली आहे. केजरीवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार आहेत.काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. नुकत्याच लागलेल्या कर्नाटकाच्या निवडणुकांनंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली असली तरी सीएसडीएसच्या सर्वेक्षणानुसार मोदी हेच पंतप्रधान म्हणून पहिली पसंती आहे. मात्र विरोधकांची लढाई भाजप अर्थात थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी आहे. त्यामुळे विरोधक पंतप्रधान मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्यासाठी एकजूट राहतील का? यासाठी पाहा हा यांसदर्भातील स्पेशल रिपोर्ट….