…तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्व नेत्यांना संपवायच आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात पाठवतील. असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नुकतेच जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केलाय. अरविंद केजरीवाल त्यांच्या जामीनानंतर आता आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळालय. आज अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर आरोप करताना भविष्यासंबंधी काही दावे केले आहेत. त्यासोबतच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच तुरुंगात दिसतील असा दावा केला आहे.
Published on: May 11, 2024 04:15 PM