आदित्य यांनी अरविंद सावंत यांना आनंदाने मिठी मारली आणि उचलले !, विजयानंतर सावंत ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
दक्षिण मुंबईतून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा विजयी झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला आहे. जिंकल्यानंतर अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
दक्षिण मुंबईतून 50 हजारापेक्षा जास्तीच्या लीडने विजयी झालेले अरविंद सावंत हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी विजयाची हॅट्रीक केली आहे. मातोश्रीवर मुंबईतून विजयी झालेले शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार एकापाठोपाठ भेटायला येत आहेत. अरविंद सावंत यांनी एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा दारुण पराभव केला आहे. देशाची आर्थिक राजधानीची सूत्र ज्या विभागातून हलतात त्या दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी झाले आहेत. मातोश्री आज आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडल्यानंतर ही पहीलीच निवडणूक आहे. त्यामुळे मातोश्रीवर आनंद आणि जल्लोषाचे वातावरण आहे. अरविंद सावंत युतीच्या काळात केंद्रात अवजड मंत्री होते. शिवसेनेने भाजपासोबत युती तोडल्यानंतर अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता. तसेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या सोबत न जाता अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ न सोडता त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.