“निरोप समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली वारी”, ठाकरे गटाचं टीकास्त्र
मुख्यमंत्री एकनाथ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. एकनाथ शिंदे यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 23 जुलै 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. एकनाथ शिंदे यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “निरोप समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आहे, असं मला वाटतं. ” अरविंद सावंत यांनी मणिपूर दुर्घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे.
Published on: Jul 23, 2023 02:45 PM