ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमध्ये बिनसलं? अरविंद सावंत म्हणतात…
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट भूमिका घेतली होती ,आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत.महाराष्ट्र आज संभ्रमावस्थेतून जातोय. कुठल्याही विषयाला राजकीय रंग देणं किंवा भ्रम निर्माण करणं या दोन गोष्टी होत आहेत.
मुंबई: संभाजी ब्रिगेडने स्पष्ट भूमिका घेतली होती ,आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत.महाराष्ट्र आज संभ्रमावस्थेतून जातोय. कुठल्याही विषयाला राजकीय रंग देणं किंवा भ्रम निर्माण करणं या दोन गोष्टी होत आहेत.आज संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत बैठक झाली.संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाचा संयुक्त मेळावा होणार आहे.जुलै महिन्यात रंगशारदा येथे एक संयुक्त कार्यक्रम होणार, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं आहे. आज शिवसेना भवनात उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये बैठक पार पडली.
Published on: May 30, 2023 04:16 PM