“आनंद दिघेंच्या अटक आणि मृत्यूवरून राजकारण”, जितेंद्र आव्हाडांच्या विधानावरून शिवसैनिक संतापला

| Updated on: Jun 08, 2023 | 9:07 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना जामिनासाठी शरद पवार यांनी मदत केली होती, असे वक्तव्य नुकतेच केले होते. त्यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वादावर आता शिवसैनिक अरविंद वाळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबरनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना जामिनासाठी शरद पवार यांनी मदत केली होती, असे वक्तव्य नुकतेच केले होते. त्यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वादावर आता शिवसैनिक अरविंद वाळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जवळून ओळखणाऱ्या शिवसैनिकांपैकी मी एक असून दिघे साहेबांना ज्यावेळी अटक झाली आणि त्यांना टाडा लावला, तो टाडा त्यांना लागतच नव्हता. टाडा लागल्यानंतर ठाणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील शिवसैनिक, विद्यार्थी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांनी मोर्चे काढले. त्याची दखल कोर्टालाही घ्यावी लागली आणि त्यांना सोडावं लागलं. त्यामुळे आता जे काही लोक याचं श्रेय घेत असतील ते चुकीचं आहे”, असं वाळेकर म्हणाले. “दिघे साहेबांची अटक आणि मृत्यू याचं अनेक वर्षांपासून राजकारण सुरू आहे. कारण अनेकांना असं वाटत होतं, की दिघे साहेब गेल्यानंतर ठाणे जिल्हा आमचाच होईल. परंतु त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील, म्हणून अशी वक्तव्य केली जात आहेत. मी एक शिवसैनिक म्हणून अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आव्हाड यांना विनंती करतो, की दिघे साहेबांबाबत वारंवार अशी वक्तव्य करू नयेत”, असंही वाळेकर म्हणाले.

Published on: Jun 08, 2023 09:07 AM
“लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार”; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष!
पंकजा मुंडे भाजपात नाराज? सुजय विखे पाटील म्हणतात,”मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा”