VIDEO | अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच ‘आयसीयू’त; सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात
अनेकांना शासकीय रुग्णालये म्हणजे आधार वाटतं असतात. पण अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांनाच आता आधाराची गरज आहे. सध्या हीच रूग्णालये व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सामान्यांचे हाल होत आहेत.
अमरावती : सर्वसामान्यांना अरोग्याच्या दृष्टीने कमीत कमी खर्चात उपचार देण्याचे काम शासकीय रुग्णालये करत असतात. त्यामुळे अनेकांना शासकीय रुग्णालये म्हणजे आधार वाटतं असतात. पण अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांनाच आता आधाराची गरज आहे. सध्या हीच रूग्णालये व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सामान्यांचे हाल होत आहेत. पण अमरावती जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तब्बल डॉक्टरांच्या 50% जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. तर क्लास वन डॉक्टरांच्या ही आहेत जागा रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयातील मंजूर 41 पदापैकी भरल्या 21 जागा भरल्या असून 50% जागा रिक्त आहेत. त्यामुळे कुणाकडे पहावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तर जिल्हा आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. धावपळ करावी लागत आहे.
Published on: May 30, 2023 10:29 AM