‘आताही बॅगा घेऊन आलोय’, संजय राऊत यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

| Updated on: May 16, 2024 | 1:56 PM

पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते की, मुख्यमंत्री प्रचार सभेला जाताना त्यांच्यासोबत पैशांची बॅग घेऊन जात आहेत. राऊतांच्या याच टीकेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशकात दाखल होताच उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले, आताही बॅगा घेऊन आलोय असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.आज एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत असणाऱ्या बॅगांची तपासणी करण्यात आली. परंतू या बॅगांमध्ये त्यांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही.

Published on: May 16, 2024 01:56 PM
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
बाळासाहेबांच्या खोलीत शाहांनी नेमके कोणते शब्द वापरले? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा