Eknath Khadse एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केला जल्लोष

| Updated on: Jun 09, 2022 | 5:30 PM

नाथाभाऊंना उमेदवारी जाहीर होताच जळगावमध्ये कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.

जळगाव – महाविकास आघाडीने जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांना विधान परिषदेची उमदेवारी जाहीर केली. नाथाभाऊंना उमेदवारी जाहीर होताच जळगावमध्ये(Jalgav) कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar)तुम आगे बढो हम्म तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अश्या घोषणाही देण्यात आल्या. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. एकनाथ खडसेनेही दिलेल्या संधीचे सोने करने असे म्हणत राष्ट्रवादीचे आभार मानले आहेत.

 

 

 

 

Published on: Jun 09, 2022 05:30 PM
Video : 21 जुलैपर्यंत देशाला नवे राष्ट्रपती मिळणार, देशाच्या घटनात्मक प्रमुखपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
MNS Vasant more : पुण्यातील मनसेचे नेते वंसत मोरेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट