परभणीत संततधार थांबली; बळीराजा पावसानंतर शेतात रमला
मात्र जुलै महिन्यात मान्सूनने जोरदार मुंसडी मारली आणि राज्यात पावसामुळे आता हाहाकार माजल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता अनेक जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे.
परभणी, 30 जुलै 2023 | गेल्या महिन्यात पावसाने राज्यातील शेतकऱ्याला रडकुंडीला आणले होते. अनेक ठिकाणी अवकाळी पावसानंतर पाऊसाने पुर्ण दडी मारली होती. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. तर पाऊस पडतो की नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. मात्र जुलै महिन्यात मान्सूनने जोरदार मुंसडी मारली आणि राज्यात पावसामुळे आता हाहाकार माजल्याचे पाहायला मिळत आहे. याचदरम्यान आता अनेक जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात साधारण चांगल्या प्रतीचा पाऊस झालाय. त्यामुळे शेतातील कामे थांबली होती. पण आता पावसाने विश्रांती घेतल्याने शेती कामांना आता वेग आलाय. तर पावसानंतर खूरपनी, खत पेरणी, वखरनी अशी वेगवेगळ्या शेती कामात आता शेतकरी रमलाय. पाहा त्याचा हा व्हिडिओ…
Published on: Jul 30, 2023 09:14 AM