अन् शिंदे सरकार पडेल; कुणी आणि का केलाय दावा? पाहा…

| Updated on: Feb 09, 2023 | 3:59 PM

कायदेतज्ज्ञ अॅड असीम सरोदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भविष्याबद्दल महत्वाचं विधान केलंय. ते काय म्हणालेत, पाहा...

पुणे : कायदेतज्ज्ञ अॅड असीम सरोदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भविष्याबद्दल महत्वाचं विधान केलंय. 16 आमदार अपात्र ठरण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता जास्त आहे, असं असीम सरोदे म्हणालेत. “सर्वोच्च न्यायालयात हे आमदार अपात्र ठरले. तर त्यामुळे हा निर्णय अगोदर घेणे, निवडणूक आयोगाचं चुकीचं ठरेल. पार्टी दोन प्रकारची असते एक म्हणजे ओरिजनल पार्टी आणि दुसरी म्हणजे लेजेस्टिव पार्टी. एकनाथ शिंदे निवडणूक आयोगासमोर जे सांगत आहेत ते अपूर्ण आहे. ओरिजनल पार्टी कुणाच्या नावाने रजिस्टर आहे किंवा त्याच्या अध्यक्ष कोण आहेत, हे सुनावणीत महत्त्वाचं ठरू शकतं”, असंही ते म्हणालेत.

Published on: Feb 09, 2023 03:59 PM
तिकीट न मिळाल्याने काँग्रेस नेत्याची नाराजी, राहुल गांधी यांचा एक फोन अन्…
नाना पटोले ‘डॅशिंग लीडर’, पण… अंतर्गत धुसफूस, यशोमती ठाकुर यांची मोठी प्रतिक्रिया