Ravi Rana | ‘ठाकरे सरकारनं 12 आमदारांचं निलंबन करून लोकशाहीची हत्या केली होती’

| Updated on: Jan 28, 2022 | 5:02 PM

गेल्या वर्षी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा(BJP)च्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. तर आज सुप्रीम कोर्टा(Supreme Court)ने सर्व बाराही आमदारांचं निलंबन रद्द केलं. यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारनं 12 आमदारांचं निलंबन करून लोकशाहीची हत्या केली होती, अशी टीका त्यांनी केली.

गेल्या वर्षी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा(BJP)च्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. तर आज सुप्रीम कोर्टा(Supreme Court)ने सर्व बाराही आमदारांचं निलंबन रद्द केलं. यावर अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ठाकरे सरकारनं 12 आमदारांचं निलंबन करून लोकशाहीची हत्या केली होती. 12 आमदार व त्यांच्या मतदार संघावर अन्याय केला होता. त्या मतदारसंघातली विकासकामं रखडली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला तो लोकशाहीला पोषक असून न्याय मिळवून देणारा आहे. वारंवार ठाकरे सरकार चुका करत आहे. तर सुप्रीम कोर्टानं ठाकरे सरकारवर ओढलेले ताशेरे हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली.

Pravin Darekar | ‘राज्य सरकारच्या मुजोरीला सुप्रीम कोर्टाची चपराक, शेवटी सत्याचाच विजय झाला’
Nana Patole यांच्या पत्त्यावर मनोरुग्णांना दिलं जाणारं औषध कुणी पाठवलं?