“तुम्हाला सावरकर हवे की औरंगजेब?”, ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरे यांना सवाल

| Updated on: Jun 23, 2023 | 3:51 PM

माहीम परिसरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता.मध्यरात्री अज्ञातांनी बॅनर लावले असून स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हा बॅनर हटवला. या बॅनरमुळे एकच खळबळ माजली आहे. या बॅनरमुळे भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : माहीम परिसरात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता.मध्यरात्री अज्ञातांनी बॅनर लावले असून स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हा बॅनर हटवला. या बॅनरमुळे एकच खळबळ माजली आहे. या बॅनरमुळे भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “औरंगजेबाच्या कबरीवर फुल चढवणारे उद्धव ठाकरे गटाचे मित्र कसे?आणि सावरकरांचे बदनामी करणारे उद्धव ठाकरे यांचे पाटर्नर बनतात. त्यामुळे महाराष्ट्र आता त्यांना प्रश्न विचारत आहे की, की तुम्हाला सावरकर हवेत की ऒरंगजेब? काय ते स्पष्ट उत्तर द्या.एवढं एवढं पाणी आणि गोल गोल राणी करू नका.”

Published on: Jun 23, 2023 03:51 PM
ईडीच्या रडारवर आता किशोरी पेडणेकर; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?
“एक दिवस अजितदादा उठाव करतील”, शिवसेनेच्या नेत्याची प्रतिक्रिया