Ashish Jaiswal : …याचा उद्धव ठाकरे यांनी गांभीर्यानं विचार करावा, शिवसेनेचे बंडखोर आशिष जैस्वाल यांचा इशारा

| Updated on: Jul 06, 2022 | 9:45 PM

महाविकास आघाडी सरकारमधून बंड करून 40 शिवसेना (Shivsena) आमदार बाहेर पडले. त्यामुळे सरकार बदलले. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात येण्यासाठी आणखी अनेक नेते उत्सुक आहेत, असे आशिष जैस्वाल म्हणाले.

नागपूर : पक्ष ह कुणाचीही खासगी मालमत्ता नाही, असे म्हणत नागपूरचे शिवसेना आमदार आशिष जैस्वाल (MLA Aashish Jaiswal) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बंड करून 40 शिवसेना (Shivsena) आमदार बाहेर पडले. त्यामुळे सरकार बदलले. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात येण्यासाठी आणखी अनेक नेते उत्सुक आहेत, असे जैस्वाल म्हणाले. विदर्भाचाच विचार केला तर शिवसेनेचे 70 टक्के खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी शिंदे यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांचा गांभीर्याने विचार करावा, असा इशाराही जैस्वाल यांनी दिला आहे. महाविकास आघाडी सरकारला 170 आमदार असण्याचा अहंकार होता, त्याविरोधात आमदारांनी उठाव केला. त्यामुळे त्यांना खरी जागा दिसली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तावडीतून शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही केलेला हा प्रयत्न आहे, असेही जैस्वाल म्हणाले.

Published on: Jul 06, 2022 09:45 PM
Special Report | ठाकरे Vs शिंदे…शिवसेना नेमकी कोणाची?
Slab collapsed : कामगार रुग्णालयाच्या सुरक्षा भिंतीचा स्लॅब कोसळला, सुदैवानं जीवितहानी नाही