शरद पवारांच्या भेटीसाठी आशिष शेलार सिल्वर ओकवर
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात आशिष शेलार असल्याचे सांगण्यात येत असून त्यासाठीच त्यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार आणि आशिष शेलार यांची कालच ही भेट होणार होती, मात्र काही कारणास्तव पुढे ढकलल्याने ती आज भेट झाली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आशिष शेलारांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट त्यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन घेतली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक होत असल्याने ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते, त्यासाठी आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात आशिष शेलार असल्याचे सांगण्यात येत असून त्यासाठीच त्यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार आणि आशिष शेलार यांची कालच ही भेट होणार होती, मात्र काही कारणास्तव पुढे ढकलल्याने ती आज भेट झाली आहे.
Published on: Sep 13, 2022 10:23 AM