दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत? म्हणून ठाकरे-केजरीवाल भेट? भाजप नेत्याचा सवाल
Ashish Shelar : 6 मुद्दे मांडत भाजपच्या नेत्याचं महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल; दिल्लीतील आपप्रमाणे मविआ सरकार तळीरामांसाठी सरकार होतं!; आशिष शेलारांचं टीकास्त्र
मुंबई : दिल्लीच्या मद्यधोरणासंदर्भात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना अटक झाली. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. “आप पक्षाचे सिसोदिया हे ज्याप्रमाणे दारू उत्पादकांसाठी विशेष योजना तयार करत होतं. त्याचप्रमाणे, महाराष्ट्रातही मविआ सरकार तळीरामांसाठी सरकार चालवत होतं. ज्या पद्धतीने दिल्लीत मनिष सिसोदिया यांनी दारुवाल्यांवर खैरात केल्याचा आरोप आहे. तशीच खैरात त्याच काळात महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकारने केली होती”, असं ट्विट शेलारांनी केलंय. “विदेशी दारुवरील कर माफ, बार-पबच्या परवाना शुल्कात सवलत, वाईन किराणा दुकानात विकण्यास परवानगी, दिल्लीत सुरु असलेल्या सीबीआय चौकशीचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत? महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? म्हणूनच श्री.अरविंद केजरीवाल भेटीसाठी आले? दारुवाल्यांचे तत्कालीन ठाकरे सरकार संशयाच्या घेऱ्यात?”, असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.