‘रुमाल गुलाबी निय्यत खराबी, मत विभाजनासाठी महाराष्ट्रात’, बीआरएसवर अशोक चव्हाण यांची टीका

| Updated on: Jul 03, 2023 | 12:06 PM

माऊलीच्या दर्शनाला येताना 400 गाड्यांचा ताफा सोबत घेत सोलापूरात मोठी सभा घेतली होती. तर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी त्यावेळी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी टीका केली होती.

नांदेड : आषाढी वारीच्या काळात बीआरएस पक्षाचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात येत मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यांनी माऊलीच्या दर्शनाला येताना 400 गाड्यांचा ताफा सोबत घेत सोलापूरात मोठी सभा घेतली होती. तर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी त्यावेळी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी टीका केली होती. त्यानंतर आता काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रथमच बीआरएस पक्षावर टीका केलीय. त्यांनी, रुमाल गुलाबी निय्यत खराबी अशी बीआरएसची परिस्थिती असल्याचे म्हटलं आहे. तसेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र राज्य सरकारने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. ती मत काँगेसला मिळणार म्हणून बीआरएसला आणल्याचा आरोप चव्हाण यांनी भाजपवर केला. तर तो बाबा तेलंगणात काम करत नाही पण महाराष्ट्रात फिरतोय असे म्हणत ते महाराष्ट्रात फक्त काँगेसची मत खाण्यासाठीच आलेत अशी टीका केली आहे. मोठा फौजफाटा घेउन विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. मनी नाहीं भाव आणि देव मला पाव हाच त्यांचा कार्यक्रम सुरू होता. पण विठ्ठल त्यांना पावणार नाही असंही चव्हाण म्हणालेत.

Published on: Jul 03, 2023 12:06 PM
“…म्हणून अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले”, बच्चू कडू यांनी सांगितलं कारण
“ऑपरेशन लोटसच्या नावाखाली भाजप चिखल करतंय”, नाना पटोले यांचा घणाघात