“…तर राज्यात दुसरा मुख्यमंत्री नेमला जाऊ शकतो”, 16 आमदार अपात्रतेबाबत असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jul 09, 2023 | 10:14 AM

शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे: शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस कशी बजावली याची कायदेशीत्या तपासावी लागेल. सुप्रीम कोर्टानं एकनाथ शिंदे यांची निवड आणि प्रतोद यांची निवड बेकायदेशीर आहे, असं म्हटलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी मागेच अपात्रतेचा निर्णय घ्यायला हवा होता. जर अपात्र ठरवणार असतील तर त्या आधीच दुसरा मुख्यमंत्री राज्यात नेमला जाऊ शकतो. अजित पवार किंवा भाजपा ठरवेल तो, मात्र अध्यक्षांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल.” तसंच “अजित पवार यांच्या बंडामुळे शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीतही कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच आहेत. अजित पवार गटानं केलेल्या नियुक्त्या या कायदेशीर नाहीत. सुप्रीम कोर्टानं शिवसेनेबाबत निकाल देताना जे काही सांगितलं. व्हीप किंवा नेता निवडण्याचे अधिकार पक्षाच्या अध्यक्षांना आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगालही कायदेशीर बाजू तपासावी लागेल,” असं सरोदे म्हणाले.

 

Published on: Jul 09, 2023 10:14 AM
‘मानस बे भरोशाची असतात’; मुख्यमंत्री शिंदे यांची नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका
Special Report : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अक्टिव्ह मोडमध्ये; शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांना पाठवली नोटीस