Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाचा निकाल आज लागणार? असीम सरोदे म्हणाले…

| Updated on: Mar 15, 2023 | 1:54 PM

Asim Sarode on Supreme Court : राज्यातील सत्तासंघर्षावर आज निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अॅड. असीम सरोदे यांनी याबाबत महत्वाचा मुद्दा मांडला आहे. पाहा...

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. आज या सगळ्या राजकीय पेचावर निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज हा निकाल येऊ शकतो का? याबाबत अॅड. असीम सरोदे यांनी tv9 मराठीला आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कोर्ट आज निकाल देणार नाही. तशी शक्यता फारच कमी आहे. तर निकाल राखून ठेवला जाईल”, असं असीम सरोदे म्हणाले आहेत. “पाच मुद्द्यावर आम्ही आज युक्तीवाद करणार आहोत. पाच मुद्दे आम्ही जोडपत्रातून सुप्रीम कोर्टाला दिले आहेत. आमदार अपात्र असतानाही ते कार्यवाही करतात. राज्यपालांनी 28 तारखेला बहुमत चाचणीसाठी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 30 तारखेला शपथ दिलेली. अध्यक्ष निवडणूक या मुद्द्यावर आम्ही आज युक्तीवाद करणार आहोत, अशी माहिती ठाकरे गटाचे वकिल सनी जैन यांनी दिली आहे.

4 Minutes 24 Headlines | राज्यपालांच्या त्या कृतीवर सर्वोच्च न्यायालय, म्हणाले…
पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं काम अंतिम टप्प्यात; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी