पत्रास कारण की… आसामच्या मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र
Assam Cm Himanta Biswa Sarma Latter To CM Eknath Shinde : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे एका आमदाराचं वक्तव्य. पाहा...
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यबाबत हेमंत बिस्वा शर्मा यांनी हे पत्र लिहिलं आहे. बच्चू कडू यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपलं वक्तव्य मागे घ्यावं. दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आसामचे नागरिक आणि मांसाहार याबाबत बच्चू कडू यांनी विधिमंडळात बोलताना वक्यव्य केलं होतं.त्यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आसामच्या विधिमंडळातही याचे पडसाद पाहायला मिळाले होते.
Published on: Mar 23, 2023 08:04 AM