बच्चू कडू यांना अटक करा; थेट आसामच्या विधानसभेत मागणी

| Updated on: Mar 12, 2023 | 12:19 PM

Bacchu Kadu : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना अटक करण्याची मागणी आसामच्या विधानसभेत करण्यात आली आहे. पाहा नेमकं प्रकरण काय आहे?

दिसपूर, आसाम : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना अटक करण्याची मागणी आसामच्या विधानसभेत करण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या अटकेची विरोधी पक्षाने मागणी केली आहे. राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बोलताना बच्चू कडू यांनी कुत्र्यावरून केलेल्या वक्तव्याचे पडसाद आसामच्या विधानसभेत पाहायला मिळाले. दरम्यान बच्चू कडू यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. आसाम राज्यातील लोकांच्या भावना दुखल्या असेल तर मी माफी मागतो, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. नागालँडमधील लोक कुत्रं खातात. आसाम आणि नागालँडमधील दोन्ही राज्य जवळपासच आहेत. त्यामुळे मी चुकून नागालँड ऐवजी आसाम असं मी बोलून गेलो, असंही बच्चू कडू म्हणालेत.

Published on: Mar 12, 2023 12:17 PM
Jalyukt Shivar Yojana : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा
रंग बरसे! म्हणत साठी पार तरूणांची आयुष्याची संध्याकाळ आनंदी; पाहा व्हीडिओ…