महाराष्ट्रात ‘गोवंश हत्या’ होऊ देऊ नका; विधानसभा अध्यक्षांचे थेट कोणाला पत्र?

| Updated on: Jun 17, 2023 | 1:15 PM

कोल्हापूर सारख्या वैचारिक शहरात देखील दंगल सदृश्य स्थिती उद्धभवली होती. याचदरम्यान आता मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सन ही जवळ येत आहे. यावेळी बकऱ्यासह इतर जनावरांची कुरबानी दिली जाते. त्याचपार्श्वभूमिवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलिसमहासंचालकांना पत्र लिहलं आहे.

मुंबई : राज्यात गेल्या महिन्याभरता अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे अनेक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचदरम्यान कोल्हापूर सारख्या वैचारिक शहरात देखील दंगल सदृश्य स्थिती उद्धभवली होती. याचदरम्यान आता मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सन ही जवळ येत आहे. यावेळी बकऱ्यासह इतर जनावरांची कुरबानी दिली जाते. त्याचपार्श्वभूमिवर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलिसमहासंचालकांना पत्र लिहलं आहे. तसेच आपल्याकडे गोवंश हत्येप्रकरणी काही तक्रारी आल्या आलेत. त्यानुसार त्यांचा योग्य तो तपास व्हावा. अनेक गोवंश हत्या होतात, याची शहानिशा करावी. तसेच गोवंश हत्येप्रकरणी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर गोवंश होणार नाही याची खबरदारी सरकारकडून घेण्यात येईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 17, 2023 01:15 PM
‘गावच्या जत्रेमधील तंबू म्हणजे शिवसेना’; शिंदे गटावर राऊत यांची टीका
‘मंत्रिमंडळ विस्तारा होणार नाही, आणि झाला तर..’, राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य