अमोल मिटकरींचा शिंदे-फडणवीस सरकारला टोला; म्हणाले, या सरकारला…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत निशाना साधला आहे. मिटकरी यांनी, फक्त मंत्र्यांना धक्का लोकांचा लागतो म्हणून विधिमंडळाने आता पासेस बंद केले
मुंबई : अधिवेशन काळात विधानभवन परिसरात असणाऱ्या शुकशुकाट, आभाळलेले वातावरण, सुरू असणारा संप, आणि धडकणारे लाल वादळ यावरून सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत निशाना साधला आहे. मिटकरी यांनी, फक्त मंत्र्यांना धक्का लोकांचा लागतो म्हणून विधिमंडळाने आता पासेस बंद केले. त्यामुळे विधीमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी येणारे विद्यार्थी, जनता तेथे नाही. लोकांची जी रेलचेल असायची ती नाही. त्यामुळेच येथे शुकशुकाट दिसतोय. कामगिरी दमदार, गतिमान सरकार म्हणणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारला हे अधिवेशन सुतक असल्यासारखं दिसतं असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.
Published on: Mar 15, 2023 11:53 AM