“…तर पंतप्रधान मोदी यांचा पराभव करणे अवघड,” विरोधकांच्या बैठकीवर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jun 25, 2023 | 9:35 AM

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशासह राज्यातील पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये विरोधकांची बैठक बोलावली होती. यात विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या या बैठकीवर एमआयएमने नाराजी व्यक्त केली आहे.

बुलढाणा: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी देशासह राज्यातील पक्षांनी तयारी सुरु केली आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये विरोधकांची बैठक बोलावली होती. यात विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या या बैठकीवर एमआयएमने नाराजी व्यक्त केली आहे. एमआयएमचे खासद असुद्दीन ओवेसी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, “पाटणामध्ये विरोधकांची बैठक बोलावली होती यात एमआयएमला बोलवलं नाही. मायावती यांनीही बोलावले नाही. बैठकीला हजर नेतेच पंतप्रधान मोदी व भाजपला पराभूत करू शकणे अशक्य वाटते. आमच्यासह सर्व पक्ष एकत्र आले तरच भाजप पराभूत होऊ शकते. 2024 मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव व्हावा, असं आम्हालाही वाटतं.एकत्र यायचे असेल तर आम्हाला त्यांनी सोबत घ्यायला पाहिजे.”

Published on: Jun 25, 2023 09:35 AM
कोकणात जाणाऱ्यां-येणाऱ्यांनो जरा थांबा! ‘या’ घाटात वाहतुकीला फटका; पहिल्याच पावसात रस्त्यावर…
ओडिशाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एक रेल्वेचा मोठा अपघात