Sanjay Raut | ‘माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फूलवाल्याला उचललं
दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut Press Conference) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राकडून होत असल्याचा सनसनाटी आरोप केला.
दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत (Sanjay Raut Press Conference) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राकडून होत असल्याचा सनसनाटी आरोप केला. या आरोपांसोबत त्यांनी आपल्याला आलेले अनुभवही या पत्रकार परिषदेत सांगितले. आपल्या मुलीच्या लग्नाच्या (Sanjay Raut daughter wedding) डेकोरेशनसाठी आलेल्या फूलवाल्याला ईडीच्या लोकांनी उचललं, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याला धमकावत अंदर डाल देंगे असा इशारा ईडीनं दिला होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात येऊन डेकोरेशनसाठी आलेल्या फूल वाल्याला ईडीच्या अधिकाऱ्यांनी (Raut Allegations on ED) चौकशीसाठी नेलं. यानंतर त्याच्याकडे प्रश्न उपस्थित करत त्यांची उलट तपासणी केली. यातून पैशांबाबत त्याला विचारणा करण्यात आली.