Bhagat Singh Koshyari : राज्यपाल योगेश्वरी देवीच्या दर्शनाला, कोश्यारी आंबेजोगाईच्या मातेसमोर नतमस्तक
मंदिरात त्यांनी पुजाऱ्याकडून टिळा लावून घेतला. तीर्थही सेवन केलं. पूजाऱ्याला दक्षिणा द्यायला राज्यपाल विसरले नाहीत. खूप आधी यायचं ठरविलं होतं. येण्यास उशीर झाला. आंबेजोगाईचं हे प्राचीन मंदिर असल्यांचं त्यांनी सांगितलं.
बीड : कोकणवासियांची कुलस्वामिनी असलेली आंबेजोगाईची माता योगेश्वरी देवीचे दर्शन आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले. कोश्यारी हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आंबेजोगाईमध्ये योगेश्वरी देवीचे दर्शन घेतलं. मागच्या अनेक दिवसापासून देवीच्या दर्शनाला यायचं ठरलं होतं. आज मी आलो, या यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठीतून मी खूप कौतुक करतो असं म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळं कोश्यारी यांनी मास्क घातला होता. मंदिरात त्यांनी पुजाऱ्याकडून टिळा लावून घेतला. तीर्थही सेवन केलं. पूजाऱ्याला दक्षिणा द्यायला राज्यपाल विसरले नाहीत. खूप आधी यायचं ठरविलं होतं. येण्यास उशीर झाला. आंबेजोगाईचं हे प्राचीन मंदिर असल्यांचं त्यांनी सांगितलं. येथं येऊन आनंद आल्याचं ते म्हणाले.
Published on: Aug 19, 2022 07:41 PM