मविआचे नेते आंदोलने करण्यात व्यस्त होते; भाजप नेत्याची टीका
महाविकास आघाडीने किती एकत्र आले, कितीही सभा घेतल्या तरिही लोक त्यांना पसंती देणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची शिवसेना 2024 साली सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही असेही पडळकर म्हणाले
सांगली : आटपाडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर याच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावगाड्यापासून शहराच्या विकासापर्यंत असणारा अर्थसंकल्प मांडला. पहिल्यांदाच सर्वसामान्यांचा विचार करणार अर्थसंकल्प सादर झाला. मात्र मविआचे नेते आंदोलने करण्यात व्यस्त होते. त्यांना निर्णय घेता आला नाही. शेतकरही हा महाराष्ट्र आणि देशाचा बेस असल्याने राज्यासह केद्राने शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने किती एकत्र आले, कितीही सभा घेतल्या तरिही लोक त्यांना पसंती देणार नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची शिवसेना 2024 साली सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही असेही पडळकर म्हणाले.
Published on: Apr 03, 2023 08:54 AM