Jaykumar Gore यांच्यासह 5 जणांवर Atrocity चा गुन्हा दाखल
जयकुमार गोरेंसह पाच जणांवर फसवणूक, अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मयत माणसाला जिंवत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज केल्याचा ठपका गोरेंवर ठेवण्यात आला आहे.
सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रोसिटी (Atrocity) प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे आमदार (Satara BJP MLA) आहेत. जयकुमार गोरेंसह पाच जणांवर फसवणूक, अनुसूचित जाती जमाती कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मयत माणसाला जिंवत दाखवून जमिनीचा दस्ताऐवज केल्याचा ठपका गोरेंवर ठेवण्यात आला आहे.