‘कुटुंबावर, पक्षावर हल्ला म्हणजे नक्कीच आमच्यात…,; सुप्रिया सुळे यांचा कुणावर हल्लाबोल?
आमची महिला भगिनी ड्रगजसाठी लढत आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या बाजूने उभे आहोत. राष्ट्रवादीशिवाय खोके सरकारचा दिवस सुरू होत नाही आणि मावळतही नाही. सरकारच्या काळात शाळा कमी होत आहेत आणि दारूची दुकाने वाढत आहेत.
सातारा | 19 ऑक्टोंबर 2023 : राज्यात मोठी आव्हाने आहेत. पण, अतिशय संवेदशील सरकारचे त्याकडे लक्ष नाही. आईस (इन्कमटॅक्स, सीबीआय आणि इडी) मध्ये ते व्यस्त आहेत. बावनकुळे यांचा एक व्हिडिओ पाहिला पुढचे प्रधानमंत्री कोण तर राहुल गांधी असे लोक सांगतात हे मी पाहिलं. माझी वैयक्तिक लढाई कुणाशी नाही. माझी लढाई नैतिकतेची आहे. आमच्या कुटुंबावर भाजपने हल्ला केला, पक्षावर हल्ला केला म्हणजे नक्कीच आमच्यात काही तरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ऑन रेकॉर्ड सांगते. जातीय जनगणना झाली पाहिजे मी या राज्याच्या गृह मंत्र्यांना हात जोडून विनंती करते. स्पष्ट बोला, खरे बोला आणि काय ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. तुम्ही राज्याला म्हणाला खरे सांगणार ते कधी? तुम्ही गृह मंत्री असताना आरोपी पळून कसा गेला? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना केला.