“संजय राऊत यांची राजकीय किंमत शून्य”, भाजप नेत्याचा घणाघात

| Updated on: Jun 13, 2023 | 9:11 AM

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. भातखळकर म्हणाले, “औरंगजेबाचं रक्त कोणाच्या रक्तात आहे, हे जाऊन संजय राऊत यांनी अबू आझमी यांना विचारावे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे औरंगजेबाचं गुणगान गात होते. संजय राऊत फुकटची बडबड करत आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. संजय राऊत यांची राजकीय किंमत आता शून्य आहे. वारीमध्ये लाटीच्या झालाच नाही, हे उपमुख्यमंत्री यांनी देखील सांगितले. संत परंपरेचा राजकीय वापर करू नये.”

Published on: Jun 13, 2023 09:11 AM
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला? गिरीश महाजन म्हणतात, “दिल्लीतून ग्रीन सिग्नल…”
‘…त्यांचा मेंदू तपासण्याची गरज’, राष्ट्रवादीच्या नेत्यानं लगावला खोचक टोला