मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, तो हिरवा साप! चंद्रकांत खैरे भडकले, पाहा Video!

| Updated on: Nov 05, 2022 | 2:59 PM

महाविकास आघाडीतही मंत्री झाल्यानंतर शहाणा झाला. पण पांडुरंग या गद्दारांना कधीही माफ करणार नाही...अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

दत्ता कनवटे, औरंगाबादः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सिल्लोड (Sillod) यांच्या सभेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद विकोपाला गेले आहेत. हिंमत असेल तर सिल्लोडमध्ये येऊन निवडून दाखवा, असे आवाहन अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा सिल्लोड दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी ही सभा रद्द झाल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरे घाबरले अशी टीका अब्दुल सत्तारांनी केली. यावर औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भडकले. अब्दुल सत्तारांना उद्देशून ते म्हणाले, ‘ त्याला मी आता असा सरळ करीन. तो काहीही बडबड करतो. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तो हिरवा साप आहे. सरडा आहे. तेव्हा घाबरत होता. महाविकास आघाडीतही मंत्री झाल्यानंतर शहाणा झाला. पण पांडुरंग या गद्दारांना कधीही माफ करणार नाही…’

 

Published on: Nov 05, 2022 02:59 PM
Video | अंबादास दानवेंची सभा, अचानक बत्ती गुल… काय घडलं?
लवकरच अनेक पक्षांत बॉम्बस्फोट, मविआला उमेदवारही मिळणार नाहीत, भाजपच्या नेत्याचा मोठा दावा!