औरंगाबाद नामांतरणावरून अंबादास दानवेंनी आंदोलक संघटना आणि पक्षांना सुनावलं, म्हणाले…

| Updated on: Mar 18, 2023 | 1:46 PM

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एमआयएमसह शहरात आंदोलने करणाऱ्या संघटना आणि पक्षांवर तोफ डागली आहे

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर करण्यात आले. तेव्हा पासून गेली 24 दिवस या ना त्या संघटनेने नामांतरणाच्या विरोधात किंवा समर्थनार्थ शहरात आंदोलने केली आहे. तर बाहेरून लोक आणून शहराचं वातावरण खराब केलं जात आहे. या विषयाला हिंदू-मुस्लिम मुद्दा केला जातोय असे म्हणत साखळी उपोषण बंद करत असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी एमआयएमसह शहरात आंदोलने करणाऱ्या संघटना आणि पक्षांवर तोफ डागली आहे. तसेच औरंगाबाद शहराचे आता नामांतरण झाले आहे. आता काही होणार नाही. तरिही कोणाला न्यायालयात जायचं असेल तर खुसाल जा. रस्त्यावर आंदोलन करून हा निर्णय आता बदलू शकत नाही. पण काही जण आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद शहराचे वातावरण खराब करण्याचा किंवा शहरात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Published on: Mar 18, 2023 01:00 PM
288 जागांवर भाजपच; मग शिंदे गटाचं काय? जयंत पाटील यांचं उत्तर
छोट्या पक्षांवरून जयंत पाटलांचा भाजपवर निशाना, म्हणाले, ‘हा’ तर एक कलमी कार्यक्रम