‘हा विषय हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर आणला जातोय’; नामांतराविरोधातील आंदोलन स्थगित

| Updated on: Mar 18, 2023 | 7:23 AM

नामांतरणाच्या समर्थनार्थ मनसेने आंदोलन केले. यासर्व घडामोडीनंतर आज इम्तियाज जलील यांनी सुरु केलेलं हे उपोषण आता मागे घेतलं आहे

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरू केले. त्यानंतर कॅन्डल मार्च काढला. यादरम्यान नामांतरणाच्या समर्थनार्थ मनसेने आंदोलन केले. यासर्व घडामोडीनंतर आज इम्तियाज जलील यांनी सुरु केलेलं हे उपोषण आता मागे घेतलं आहे. मात्र आता मनसे, हिंदू संघटनाही मोर्चा काढणार आहे. यावर आणि उपोषण आता मागे घेण्यावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील यांनी नामांतराविरोध असेल किंवा समर्थनार्थ आंदोलन असेल लोकशाही आहे आंदोलन करा. मात्र बाहेरून लोक आणून शहराचं वातावरण खराब केलं जात आहे. या विषयाला हिंदू-मुस्लिम मुद्दा केला जातोय असे म्हटलं आहे.

Published on: Mar 18, 2023 07:23 AM
ST प्रवासात महिलांना 50% सूट, पण नियम अटी काय? आधी जाणून घ्या.
‘थोडा काळ थांबा पक्ष प्रवेशाचे भूकंप दिसतील’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मविआवर निशाना