24 दिवस उलटले तरी शासकीय कार्यालयांची नावं तिचं

| Updated on: Mar 24, 2023 | 11:36 AM

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही शहरातील शासकीय कार्यालयांची नावे मात्र तशीच आहेत.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर एमआयएमने त्याला विरोध केला. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण करत 14 दिवस लढा दिला. मात्र काही हिंदू संघटना आणि मनसेकडून नामांतर समर्थनार्थ आंदोलने तर रमजान आणि संसदेचं अधिवेशनामुळे हे उपोषण रद्द करण्यात येत असल्याची घोषणा जलील यांनी केली.

एकीकडे औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्यानंतरही शहरातील शासकीय कार्यालयांची नावे मात्र तशीच आहेत. शहराचे नाव बदलून 24 दिवस गेले तरी औरंगाबाद महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयाची नावे अजूनही बदलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ही नावे कधी बदलली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Published on: Mar 18, 2023 09:59 AM
आधी फॉर्म्युला ठरला; आता बावनकुळेंचा नकार
36 जिल्हे 50 बातम्या | अवकाळी, गारपिटीने शेतकरी त्रस्त, पहा राज्यात काय स्थिती