औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएमचं साखळी उपोषण, मनसे ‘या’ कृतीतून देणार जशास तसं उत्तर

| Updated on: Mar 04, 2023 | 9:42 AM

औरंगाबादच्या नामांतरावरून आज एमआयएमचं साखळी उपोषण होणार आहे. औरंगाबादच्या नामांतर विरोधी एमआयएमच्या आंदोलनाला मनसे प्रत्युत्तर देणार आहे. पाहा व्हीडिओ...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतरावरून आज एमआयएम पक्ष चांगलाच आक्रमक झालाय. एमआयएमच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला खासदार इम्तियाज जलीलदेखील उपस्थित राहणार आहेत. हे साखळी उपोषण बेमुदत सुरू राहणार आहे. आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. एमआयएमचे हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. तर नामांतर विरोधी एमआयएमच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्युत्तर देणार आहे. एमआयएमच्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं स्वाक्षरी मोहीम आंदोलन होणार आहे. टीव्ही सेंटर चौकात मनसे स्वाक्षरी मोहीम आंदोलन करणार आहे. दुपारी बारा वाजता टीव्ही सेंटर चौकात आंदोलनाला सुरुवात होणार आहे. संभाजीनगर शहराच्या सन्मानासाठी मनसे स्वाक्षरी मोहीम आंदोलन करणार आहे.

Published on: Mar 04, 2023 09:41 AM
Video : राज्यात लवकरच ‘इतक्या’ जागांसाठी मोठी शिक्षक भरती
आधी सीसीटीव्हीला चुना फासला अन् मग सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला, पाहा व्हीडिओ…