Politics of Maharashtra | राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण-tv9

| Updated on: Sep 17, 2022 | 5:45 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत. त्यामुळे हे उद्घाटन आपल्याला मान्य नाही असं सांगत हे शुद्धीकरण करण्यात आल्याचेही यावेळी कार्यकर्त्यांनकडून सांगण्यात आले आहे

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिवरायांचा अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर आता नवा वाद तोंड काढण्याचे चिंन्ह दिसत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करून त्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत. त्यामुळे हे उद्घाटन आपल्याला मान्य नाही असं सांगत हे शुद्धीकरण करण्यात आल्याचेही यावेळी कार्यकर्त्यांनकडून सांगण्यात आले आहे. मात्र यानंतर राष्ट्रवादीकडून ते कार्यकर्ते आपल्या पक्षाचे नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

 

 

 

Ajit Pawar | ‘वेदांता प्रकल्पासंदर्भातील शेलारांचे आरोप खोटे’अजित पवार-tv9
Devendra Fadnavis | ‘जिथे गडबड आहे, अशी कोणतीही चौकशी बंद होणार नाही’-tv9