केंद्रीय मंत्री कराड यांची गुलमंडीत दिवाळीची खरेदी, फोन पे केलं की कॅश दिली?
केंद्रीय मंत्री असूनही अगदी साधेपणाने शहरात केलेली ही खरेदी लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
दत्ता कनवटे, औरंगाबादः औरंगाबादचे (Aurangabad) लोकप्रिय नेते आणि केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी दिवाळीनिमित्त (Diwali) खरेदी केली. विशेष म्हणजे मंत्रिमहोदयांनी औरंगाबादची प्रसिद्ध बाजारपेठ गुलमंडी येथे जाऊन खरेदी केली. दिवाळीसाठी पणत्या, लाह्या, बत्तासे आदी खरेदी त्यांनी केली. या सर्व विक्रेत्यांना त्यांनी फोन पे द्वारे पैसे दिले. डॉ. भागवत कराड यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.डॉ. कराड यांनी सामान्यांप्रमाणे खरेदी केल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलंय. केंद्रीय मंत्री असूनही अगदी साधेपणाने शहरात केलेली ही खरेदी लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Published on: Oct 24, 2022 12:49 PM