औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत सदस्यांची बंडखोरी, 13 सदस्य गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत सदस्यांची बंडखोरी पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीतील 13 सदस्य गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. पाहा...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत सदस्यांची बंडखोरी पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीतील 13 सदस्य गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. जोगेश्वरी ग्रामपंचायतमध्ये 17 पैकी तब्बल 13 सदस्यांनी बंडखोरी केल्याची सूत्रांची माहिती आहे.शिवसेनेच्या ताब्यातील ग्रामपंचायत खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. सरपंच, उपसरपंच आणि दोन सदस्य वगळता सर्वच सदस्यांनी बंडखोरी केली आहे. सरपंच आणि उपसरपंचाकडून बंडखोर सदस्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील भोंडवे पॅलेसमध्ये बंडखोर सदस्यांचा मुक्काम आहे. दोन दिवसांत जोगेश्वरी ग्रामपंचायतीत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे.
Published on: Feb 08, 2023 12:33 PM