Video : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, औरंगाबादेतील घटना
औरंगाबादसह राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील देवगिरी कॉलेज (Deogiri Collage) परिसरात एकतर्फी (One Sided Love) प्रेमातून खून (Murder) झाला आहे. प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला अद्दल घडवण्यासाठी या नराधमाने भर कॉलेजमधून तिला 200 फूट खेचत नेले. त्यानंतर चाकूने भोसकून तिचा खून केला. या घटनेनंतर देवगिरी कॉलेजमध्ये एकच खळबळ माजली असून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी दहशत […]
औरंगाबादसह राज्याला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील देवगिरी कॉलेज (Deogiri Collage) परिसरात एकतर्फी (One Sided Love) प्रेमातून खून (Murder) झाला आहे. प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीला अद्दल घडवण्यासाठी या नराधमाने भर कॉलेजमधून तिला 200 फूट खेचत नेले. त्यानंतर चाकूने भोसकून तिचा खून केला. या घटनेनंतर देवगिरी कॉलेजमध्ये एकच खळबळ माजली असून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी दहशत माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आज याचा कहर पहायला मिळाला. शनिवारी दुपारी घडलेली ही घटना वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. यामुळे विद्यार्थिनी आणि पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Published on: May 21, 2022 04:49 PM