नामांतराविरोधात एमआयएमने केलेल्या आंदोलनाला मनसेचं उत्तर; ‘या’ दिवशी निघणार उत्तरमोर्चा

| Updated on: Mar 14, 2023 | 8:22 AM

Chhatrapati Sambhajinagar MNS Morcha : औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. या नामांतराला एमआयएमने कडाडून विरोध केला. एमआयएमच्या या आंदोलनाला मनसेने तीव्र विरोध केलाय.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं. या नामांतराला एमआयएमने कडाडून विरोध केला. यासाठी एमआयएमच्यावतीने साखळी आंदोलनही करण्यात आलं. एमआयएमच्या या आंदोलनाला मनसेने तीव्र विरोध केलाय. छत्रपती संभाजी नगरच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा रत्यावर उतरली आहे. हजारोंच्या संख्येने मनसे छत्रपती संभाजीनगर इथे मोर्चा काढणार आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजी नगरच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला उत्तर म्हणून मनसेचा उत्तरमोर्चा असेल. 16 मार्चला सकाळी 11 वाजता मनसेचा मोर्चा निघणार आहे. संस्थान गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असेल.

सत्तासंघर्षावर आज पडणार पडदा? सुनावणीकडे राज्याचे लक्ष
ईडीच्या कारवाईचा ससेमिरा; अनिल परब यांची उच्च न्यायालयात धाव