कशाला बडे जाऊपणाने सांगता? तो निर्णय तर केंद्राचा; छ. संभाजीनगरवरून बावनकुळेंची टीका

| Updated on: Apr 03, 2023 | 1:21 PM

नामांतरणाचा निर्णय हा राज्याचा नाही तर केंद्राकडे असतो. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतला

मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव झाल्यानंतर ते आपल्या सरकारनं जाता जाता केलं. मविआचे सरकार असताना केलं. जर याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध असता तर ते झालं नसतं. त्यांनी सहकार्य केलं. पाठिंबा दिल्यानेच संभाजीनगर आणि धाराशिव उद्धव ठाकरे झाल्याचे म्हटलं होतं. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कशाला बडे जाऊपणा आणता असा सवाल केला आहे. तर नामांतरणाचा निर्णय हा राज्याचा नाही तर केंद्राकडे असतो. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घेतला. त्याला शिंदे- फडणवीस यांनी पाठपुरावा केला. पण उद्धव ठाकरे हे आम्ही केलं म्हणतात. केंद्रात उद्धव होते का असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. मात्र सत्ता गेल्याने मविआचे नेते असे बोलत आहेत.

Published on: Apr 03, 2023 01:21 PM
वॉटर ग्रीड योजना? मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कोणी थांबवली? बावनकुळेंचा घणाघात
उद्धवसाहेब, तुम्ही हिंदू धर्मातील एका जातीचा वारंवार अपमान करत आहात!; ठाकरेंवर टीकास्त्र