संजय राऊत यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल; कारण काय? पाहा…

| Updated on: Feb 22, 2023 | 10:29 AM

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्याचा निषेध करत राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्याच्या या विधानाचा शिंदेगटाकडून निषेध करण्यात आला आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली 30 ते 35 जणांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला. जवाहरनगर पोलिस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावरून जवाहरनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी त्यांचा अर्ज स्वीकारत गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिलं.

Published on: Feb 22, 2023 10:27 AM
नाना पटोले-बाळासाहेब थोरात यांच्यातील वादावर तोडगा निघणार? पाहा काँग्रेसचा अहवाल काय…
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आधी अनिल देसाई यांची प्रतिक्रिया; या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं