Video : ‘कर्ज द्या, नाहीतर किडनी तरी विकू द्या’ औरंगाबादच्या बेरोजगार तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी
वाढलेली महागाई, शेतीचं नुकसान, आर्थिक अडचणी या सगळ्या संकटांनी घेरलेलं असल्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न प्रशांतला पडला.
औरंगाबाद : वाढत्या बेरोजगारीनं हताश झालेल्या एका तरुणानं चक्क किडणी विकण्याची मागणी केली आहे. औरंगाबादमधील (Aurangabad News) प्रशांत जाधव या तरुणीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रातून तरुणानं कर्ज मिळावं, यासाठी विनंती केली आहे. पण कर्ज मिळत नसल्यानं आणि बँका कर्ज नाकारत असल्यानं आता किडणी विकण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशांत जाधवने केली आहे. हा तरुण किडणी विकण्याच्या मागणीसाठी उपोषणावर बसलाय. औरंगाबादच्या वारेगाव येथील हा तरुण असून या तरुणाच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा आहे. व्यवसाय करण्यासाठी बँक कर्ज देत नाही. अशा स्थितीत बेरोजगार तरुणांनी काय करायचं, असा सवालही प्रशांत यांनी उपस्थित केला आहे. तसंच वाढलेली महागाई, शेतीचं नुकसान, आर्थिक अडचणी या सगळ्या संकटांनी घेरलेलं असल्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न प्रशांतला पडला. आता जगण्यासाठी किडणी विकूनच पैसे जमवण्याचा एकमेव पर्याय समोर आल्याचं म्हणत या तरुणानं मुख्मयंत्र्यांनी केलेली मागणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय.