Aurangabad | औरंगाबादेत 16 ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात, बजाजनगरात शिरसाट विरुद्ध शिवसेनेचा सामना

| Updated on: Aug 04, 2022 | 10:09 AM

16 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विशेषतः बजाजनगरसारख्या ग्रामपंचायतीचाही यात समावेश आहे. सकाळपासूनच ग्रामपंचायत सदस्यांनी मतदानाला सुरुवात केली आहे. सकाळी साडे सात वाजेपासून मतदारांनी आपला हक्क बजावला.

औरंगाबादः औरंगाबादमधील (Aurangabad gram Panchayat) 16 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. विशेषतः बजाजनगरसारख्या ग्रामपंचायतीचाही यात समावेश आहे. आज सकाळपासूनच ग्रामपंचायत सदस्यांनी मतदानाला सुरुवात केली आहे. सकाळी साडे सात वाजेपासून विविध ठिकाणच्या मतदारांनी आपला हक्क बजावला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील सर्वच ठिकाणची राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शिंदे गटात गेलेल्या आमदारांचा प्रभाव असलेल्या बजाजनगर ग्रामपंचायतीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जिल्ह्यातील या ग्रामपंचायत निवडणुकांतील निकाल काय लागतो, हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

Published on: Aug 04, 2022 10:09 AM
Editorial of Saamana : नड्डाजी, जरा जपून, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना शिवसेनेचा सल्ला
Shivsena: राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेत नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती, हे तीन नेते मांडणार पक्षाची बाजू