औरंगाबादच्या लेबर कॉलनीवर हातोडा
औरंगाबादच्या लेबर कॉलनीमध्ये आज मोडकळीस आलेली घरे पाडण्यास सुरुवात झाली आहे. परिसरात गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.
औरंगाबादच्या लेबर कॉलनीमध्ये मोडकळीस आलेली घरे पाडण्यास आज सुरुवात करण्यात आली आहे. घरे पाडण्यासाठी होणारा स्थानिकांचा विरोध पहाता परिसरात कलम 144 अतंर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीसह शस्त्रबंदी देखील लागू करण्यात आली आहे. आज सकाळपासून या परिसरातील घरे पाडण्यास सुरुवात झाली आहे. घरे पाडण्यास स्थानिकांकडून विरोध होताना दिसत आहे.
Published on: May 11, 2022 09:48 AM